Home Visit Blog

सात फुट सापाची कात गळ्यात घातलेला रूद्राक्ष गांगुर्डे.....!

सर, मला मोठा होऊन Forest Officer बनायचे आहे आणि जंगलातील झाडांचे, प्राण्यांचे संरक्षण करायचे आहे
असे म्हणत पहिल्या भेटीतच मन जिंकणारा रूद्राक्ष गांगुर्डे च्या घरी 5 एप्रिल 2023 रोजी भेटीचा योग आला.

रूद्राक्षचा आवाजच खुप Soft आणि प्रेमळ. आम्ही रूद्राक्षला क्लासमध्ये प्रेमाने लूदला असे म्हणतो.
( रूद्राक्ष...रूद्रा....लूदला असे नाव पडले )

रूद्राक्षच्या पहिल्या भेटीचा किस्सा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. पालक रूद्राक्षला भेटायला घेऊन आले होते. पालकांबरोबर चर्चेत कळाले रूद्राक्षचे शिक्षण 1ली ते 4थी एका करसगाव नावाच्या खेड्यात जिल्हा परिषद शाळेत झाले. आणि 5वी ला पालकांची बदली नाशिक शहरात झाल्याने रूद्राक्षला नाशिक शहरात यावे लागले. पालकांबरोबर झालेल्या 30 मिनिटांच्या चर्चेतून मुलगा अभ्यासात थोडा कच्चा असल्याचे कळले. माझ्या मनात शंका आली की हा मुलगा नवोदय परीक्षेचा एवढा अभ्यास करेल का ?

मी रुद्राक्ष ला विचारले की तुला मोठा होऊन काय बनायचे आहे तेव्हा रुद्राक्ष मला म्हणाला
सर, मला मोठा होऊन Forest Officer बनायचे आहे आणि जंगलातील झाडांचे, प्राण्यांचे संरक्षण करायचे आहे
हे शब्द ऐकून मला एक शॉकच बसला होता आयुष्यात मी पहिल्यांदा एका लहान दहा वर्षाच्या मुलाकडून ऐकलं होतं की त्याला Forest Officer व्हायचे आहे.

ज्या लहान मुलांकडे स्पष्टपणे एखादं स्वप्न असते अशा लहान मुलांना मला शिकवायला फार आवडते.

रूद्राक्ष डिसेंबर महिन्यात नवोदय क्लास साठी जॉईन झाला. पहिले दोन महिने रूद्राक्षने वेळ घेतला. पण आज रूद्राक्ष आवडीने जबरदस्त अभ्यास करत आहे. आतापर्यंत बुद्धिमत्ता 115+ प्रॅक्टीस पेपर्स सोडवले आहेत. गणित आणि मराठीचे 40+ प्रॅक्टीस पेपर्स सोडवले आहेत.
अगोदर अभ्यासाला अर्धा तास पण न बसणारा रूद्राक्ष आज दिवसाला 7 ते 8 तास अभ्यास करतो

संतोष बच्छाव सरांकडे क्लास लावण्याआधी रूद्राक्षच्या आई वडीलांनी रूद्राक्षचे 3 ते 4 क्लास बदलले पण रूद्राक्ष कुठे रमलाच नाही आणि अभ्यासाची गोडी लागलीच नाही.
रूद्राक्षची आई सांगते...
घराजवळील असलेल्या नदीत दिवसभर मासे पकडणारा रूद्राक्ष आता दिवसभर अभ्यास करायला लागला आहे
हा रूद्राक्षमधला जबरदस्त बदल पाहून पालकांचे मन नेहमी भरून येते.
रूद्राक्षची आईने तर घरात Entry करतांना भारतीय संस्कृतीप्रमाणे सरांना टिका लावून ओवाळले. ओवाळतांना आई म्हणाली, "सर आपण आमच्यासाठी देवदूत आहात"
स्टुडेंटस बरोबर पालकांच्या मनात Teacher बद्द्ल आदर असल्याचे हे उदाहरण.

रुद्राक्षाचे घर म्हणजे आजोबा आजी, आई, वडील, मोठा भाऊ असा एकत्र कुटुंब परिवार.
रूद्राक्षच्या अभ्यासात काही कमी पडायला नको म्हणून वडीलांनी हा एप्रिल पुर्ण महिना Duty Night Shift करून घेतली आहे.

आपल्या रूद्राक्षकडे घरी 15 ते 20 प्रकारचे मासे आहेत. चिमण्यांसाठी बनवलेले 3 वेगवेगळ्या ठिकाणी खोके आहेत. एका खोक्यात तर चिमणीचे पिल्लं झालेली. घरी 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. काही औषधी झाडे आहेत.

सर्वात विलक्षण म्हणजे रूद्राक्षकडे आहे सात फुटी लांब सापाची कात
सापाची कात मावेल एवढ्या मापाची एक वेगळी प्लॅस्टिक पिशवी त्याने स्वतः बनवली. व्यवस्थित Fold करून कपाटात ठेवली होती. असे करण्यासाठी ध्येयवेडेपणाच लागतो. Passion च लागते.
रूद्राक्षने निघतांना सरांना कडीपत्ताचे मोठे झाड Gift दिले

एकदा क्लासमध्ये रूद्राक्षचे बुद्धिमत्ता पेपरमध्ये 40 पैकी 35 ते 36 च्या पुढे मार्क जात नव्हते. तेव्हा एक गंमत केली.
रूद्राक्ष समोर एक बुद्धिमत्ता पेपर ठेवला. रूद्राक्षला कुस्तीतल्या पहिलवानासारखे दंड ठोकायला लावले आणि पेपरला म्हणायला लावले, थांब तुला बघतोच
मग काय आपल्या रूद्राक्षने Direct 40 पैकी 39 मार्क मिळवले..📝

असा हा आमचा रूद्राक्ष.. रूद्रा.. लूदला.
13 किलोमीटर लांब प्रवास करून नवोदय क्लास साठी येतो

मोठा होऊन नक्कीच Forest Officer होणार आणि जंगलातील झाडांचे, प्राण्यांचे नक्कीच संरक्षण करणार

Regards,
Santosh Bachhav Sir
Navoday Exam Coach
Scholarship Exam Coach
Career Counselor
Mobile - 9321177114


Regards,
Santosh Bachhav Sir
Navoday Exam Coach
Scholarship Exam Coach
Career Counselor
Mobile - 9321177114