Jawahar Navoday Exam Blog

5,000 पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहे....

काय मग भिडायचं 🤼‍♂️ का..?

Navoday Exam Student Case Study

फोन करणारे पालक कोल्हापूरचे पैलवान होते. नवोदय परीक्षेत सिलेक्ट व्हावे अशी पालकांची मनापासून ईच्छा होती. त्यासाठी मुलाने अभ्यासाचा स्पीड वाढवावा, असे वाटत होते.

🧐 Students Study View 🧐
📝मुलाचा शाळेत नवोदय क्लास चालू होता.
📝सगळे नवोदय स्टडी बुक्स बरोबर होते.
📝 मुलगा शाळेत होणाऱ्या नवोदय क्लासच्या मुलांमध्ये अभ्यास करत होता. पण पालकांना मुलाने अजून सिरीयसली अभ्यास करणे अपेक्षित होते आणि over confident होऊ नये, असे वाटत होते.


🧐 कुछ तो गडबड है 🧐
🤔 कधी कधी मुले आपल्या आजुबाजूला असलेल्या मुलांमध्ये बेस्ट असतात. आपण सर्वात हुशार आहोत असे वाटल्याने मुले थोडे रिलॅक्स होतात. मुलांचे मोटीवेशन कमी होते


👨🏻‍💼 Santosh Bachhav Sir's Observation

🎯वेळोवेळी मुलांना Competition किती टफ आहे याची जाणीव त्यांना समजेल अशा भाषेत करून द्यावी लागते.
मुलांना वेळोवेळी Challenge देणे अपेक्षित असते.

🎯 कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्ये नवोदय तयारीसाठी निवासी शाळा Residential School (म्हणजेच क्लासेस) असतात. मुले वर्षभर शाळेत जात नाहीत. फक्त निवासी शाळेत राहुन नवोदय, स्कॉलरशिप परीक्षांचा अभ्यास दिवसभर करतात. हि मुले नवोदय परीक्षा तयारी साठी 200 ते 250 प्रॅक्टीस पेपर्स सोडवून तयारी करतात
पालक अशा निवासी शाळा तयारीसाठी 1 ते 1.5 लाख रुपये फि भरतात

🎯एका निवासी शाळेत 50 ते 60 मुले असतात. अशा 100+ निवासी शाळा कोल्हापूर जिल्ह्यात असतील. म्हणजेच जवळपास 100 निवासी शाळा x 50 मुले = 5000+ मुले 200 ते 250 प्रॅक्टीस पेपर्स सोडवून नवोदय परीक्षेसाठी एक महिना अगोदर तयार असतात. म्हणजेच 5000 पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत

🎯 साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात 15,000 ते 20,000 मुले नवोदय परीक्षेला बसतात, त्यापैकी 5,000 मुले जबरदस्त तयारी करतात. हि मुले आज जरी पेपर दिला तरी नवोदय परीक्षेसाठी तयार असतात
म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात
5000 पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत

जेव्हा मुले नवोदय अभ्यासासाठी थोडं कंटाळा करतील , तेव्हा पालकांनी एक डायलॉग नक्की मुलांसमोर म्हणावा...
5000 पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत, काय मग भिडायचं 🤼‍♂️का ?


Regards,
Santosh Bachhav Sir
Navoday Exam Coach,
Scholarship Exam Coach,
Career Counselor
Mobile:9321177114