Parents Experiecne Blog


Fri Apr 5, 2024

नाशिक जिल्ह्यातून स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या 27,402 स्टुडेंटस मध्ये पहीला क्रमांक पटकावणाऱ्या स्पंदन पाटील या स्टुडेंटसच्या पालकांचा अनुभव नक्की वाचावा...!


आदरणीय संतोष सर

सर तुम्ही नेहमी म्हणतात स्वतःच्या दुनियेत प्रत्येक जण राजा असतो, परंतू बाहेरच्या दुनियेत स्वतःची राजासारखी ओळख निर्माण करण्यासाठी हिंमत लागते अन् जिद्द लागते आणि ती जिद्द ती हिंमत माझ्या मुलात निर्माण केली आदरणीय संतोष बच्छाव सरांनी संतोष सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझ्या मुलाने शिष्यवृत्ती परीक्षेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.

सरांकडे ऑनलाइन class लावला आणि मुलामध्ये खुप बदल झालेत. सरांमुळे आवडीने अभ्यासाची सवय जडली. सरांचे मोटीवेशन गोष्टी आणि डायलॉग मुळे मुलांमध्ये दिवसभर अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली.

केवळ शिष्यवृत्ती परीक्षेतच यश नाही तर जवाहर नवोदय विद्यालय नाशिक येथे गुणवत्ता यादीत माझा मुलगा चमकला. एवढ्यावरच त्याचा यशाचा आलेख थांबला नाही ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत यश संपादन करून गुणवत्तेच्या आधारावर बेळगांव कर्नाटक राज्यात सैनिक शाळेत प्रवेश मिळवला. या सगळ्या बाबींच संपूर्ण श्रेय श्री.संतोष बच्छाव सरांना जात

खऱ्या अर्थाने माझ्या मुलाचा शैक्षणिक प्रवास आता कुठं सुरु झाला आहे.
सर यापुढेही आपलं मार्गदर्शन अविरत लाभो ही सदिच्छा🙏

Thank you sir
पालक पंकज पाटील
( कु. स्पंदन पंकज पाटील हा महात्मा फुले विद्यालय बेज ता.कळवण जि.नाशिक. )


Regards,
Santosh Bachhav Sir
Navoday Exam Coach
Scholarship Exam Coach
Mobile:9321177114

A California-based travel writer, lover of food, oceans, and nature.