जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2024 मध्ये सिलेक्ट झालेला Champion
प्रबोध चौधरी, शहापूर, ठाणे
पालकांचा ऑनलाईन कोर्स अनुभव नक्की वाचावा
सर्वप्रथम संतोष बच्छाव सरांचे
मनःपूर्वक आभार..!!
आम्ही सरांच्या संपर्कात फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून आलो. माझा मुलगा प्रबोध याच्या स्कॉलरशिप परीक्षा अभ्यासासाठी आम्ही क्लासेस शोधत होतो पण ऑनलाईन क्लासेस साठी तयार नव्हतो पण
एकदा सरांचा Demo lecture आम्ही प्रबोध सोबत online attend केला. त्यामध्ये सरांची शिकवण्याची पद्धत, स्कॉलरशिप परीक्षांचा अनुभव, आतापर्यंत स्कॉलरशिप-नवोदय परीक्षांमध्ये त्यांच्यामार्फत मुलांची झालेली निवड, मुलांविषयी कळवळा आणि मुलांचा आवडता शिक्षक बनण्याची कला, या सर्वांमुळे आम्ही फारच प्रभावित झालो आणि जुलै 2023 च्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन क्लाससाठी एडमिशन घेतले.
सरांनी सांगितलेली पुस्तके, Question sets, Revision व मार्गदर्शन यामुळे प्रबोधच्या अभ्यासात प्रगती होत गेली. सुरुवातीला आम्ही फक्त स्कॉलरशिप परीक्षेसाठी आग्रही होतो, पण सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही नवोदय परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात झाली.
संतोष बच्छाव सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे प्रबोधने नवोदयचा Maths, English, Intelligence चा योग्य अभ्यास केला. त्यातही महत्वाचे म्हणजे
नाताळच्या सुट्टीत दहा दिवसांचे सरांनी रेसिडेन्सीअल क्लासेस घेऊन त्याला योग्य पद्धतीने परीक्षेसाठी तयार केले. या दिवसात संतोष बच्छाव सर व त्यांचे कुटुंबीय, तसेच रेसिडेन्सीयल क्लासच्या मुलांमध्ये प्रबोधची खूपच छान bonding झाली होती. सरांनी प्रबोधच्या विशेष पद्धतीने प्रश्न सोडवण्याच्या कौशल्यामुळे त्याला "ब्रह्मास्त्र" हे उपनाम ठेवले आहे, सर्व मुलेही त्याला ब्रह्मास्त्र म्हणूनच हाक मारत होते.
मध्यंतरी सर तुम्ही सहकुटुंब आमच्या घरी दिलेली भेट आमच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहील.
सर तुम्ही दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आज प्रबोधचे नवोदय admission साठी selection झाले आहे, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद, आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू 🙏
Regards,
Prabodh Chaudhary Father
Shahapur, Thane